Uddhav Thackeray addressing the media, taking a dig at Congress over their solo campaign strategy for Mumbai civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

भावासाठी ठाकरेंचा काँग्रेसवर घाव, बिहार निवडणुकीत राज नव्हते तरीही हार

Uddhav Thackeray Advises Congress After Bihar Election: मुंबईत स्वबळाचा नारा देणा-या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी सुनावलं आहे. बिहारच्या निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवावरुन ठाकरेंनी काँग्रेसवर घाव घातलाय. राज ठाकरेंबरोबर युती करायला इच्छूक नसलेल्या काँग्रेसला त्यांनी काय सल्ला दिलाय ?

Girish Nikam

आधीच बिहारमध्ये धुळधाण उडाली असतानाही काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. महाविकास आघाडीत मनसेला बरोबर घेण्यासही काँग्रेस इच्छूक नाही. यावरुन उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला थेट सुनावलंय.शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसच्या ‘एकला चलो’च्या नाऱ्याचा समाचार घेतलाय. बिहारच्या निवडणुकीत राज ठाकरे नव्हते तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला, अशा चिमटा काढलाय. महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावं आणि भाजपच्या अदानीशाहीविरुद्ध एल्गार पुकारावा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.

राज ठाकरेसोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असं काँग्रेसला वाटतं. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना, राज ठाकरे नव्हते. तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे? ही लढाई मुंबईची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. हे निदान मराठी बाण्याच्या काँगेसवाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसने मुंबईतील मुस्लिम, उत्तर भारतीयांची चिंता करू नये. मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील. फक्त त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे. काँग्रेसने काय करायचे हा त्यांचा प्रश्न.

मुंबईत स्वबळाचा नारा दिलेल्या काँग्रेसने मात्र बिहार आणि मुंबईशी तुलना करणं योग्य नाही असं सांगत बचावात्मक पवित्रा घेतला आहे.. बिहारमध्ये काँग्रेसला दोन अंकी जागाही जिंकता आलेल्या नाहीत. मुंबईचं गणित लक्षात घेता ठाकरेंमुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावण्याच्या भीतीमुळे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे. मात्र मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये काँग्रेस काय करणार? हा सुद्धा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT