दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी केली.
मोदींचा मणिपूर दौरा आणि आरएसएस मेळाव्यावरून टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर कर्जमाफीचे अपूर्ण आश्वासन दिल्याचा आरोप केला.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय. परंतु सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये, त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांच्यावर हल्लाबोल केला. शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी मोदींचा मणिपूर दौरा, आरएसएस मेळावा, शेतकरी कर्जमाफीवरून हल्लाबोल केलाय.
जेवढी होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करा. माझं कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. मात्र आता भाजप अजून कर्जमाफी करतच आहे. २०१७ मध्ये ला फडवणीस यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वसन दिलं होतं. मात्र अजून त्यांनी त्यांची घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना निकष बाजुला ठेवून शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजारांची मदत करा. तेथील संकट खूप मोठं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
सध्या सुरू असलेल्या फोडाफाडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जबरदस्त हल्लाबोल केला. कमळाबाईनं आपली कमळ फूलवून घेतली. भाजपनं सर्वत्र चिखल केलाय. अनेक पक्षाचे लक्ष आपला पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे. पण जे गेले ते पितळ होते. पण जे राहिले आहे ते माझ्याकडील खरं सोनं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
राज्यात अतिवृष्टीनं थैमान घातले आहे, शेतकरी रडकुंडीला आलाय. शेतकऱ्यावर आलेलं संकट निवारण्यासाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केलीय. मात्र मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ अशी कोणतीच व्याख्या नाहीये. असं म्हणत शेतकऱ्यांच्या मागणीला बगल दिली. त्यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
२०१७ त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. पण अद्याप त्याबाबत कोणतीच घोषणा केली नाहीये. त्यावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझं कर्तव्य होतं त्यामुळे मी कर्जमाफी केलीय. त्यानंतर कोरोनाचा काळ आला, त्या दरम्यान आलेल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर होता.मात्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा केला. जवळपासून तीन वर्षानंतर मोदींनी मणिपूरचा दौरा केला होता. त्यावेळी बोलताना मोदी म्हणाले होते, मणिपूरच्या नावात मणी आहे, पण मोदींना तेथील लोकांच्या डोळ्यातील पाणी दिसलं नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
राज्यात शेतकऱ्यांचे पिके चिखलात आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेत त्यांना मदत करा. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चिखलात आहेत. आपण फक्त दोन तास चिखलात बसणार आहोत, तो त्रास सहन करा आणि असल्याचं आवाहन संजय राऊत यांनी केलं. शिवतीर्थावर पावसामुळे चिखल झाला होता. त्यामुळे ठाकरे गटाचा मेळावा होणार नाही असं म्हटलं जातं होतं, त्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.