Uddhav Thackeray / Chandrakant Patil SaamTV
महाराष्ट्र

नैतिकतेचा विचार करून उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील

अनिल देशमुखांना अटक झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास वाढला.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : अनिल देशमुख (Anil Deshmukh) अचानक हजर झाले. सर्व पर्याय संपल्यांतर ते हजर झाले त्यांना अटक झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कायद्यावरचा विश्वास वाढला आहे तसेच अजित पवार यांच्या संबंधित लोकांच्या संपत्तीटील 1200 कोटींची संपत्ती सील करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नैतिकतेचा विचार करून अशांबरोबर सत्तेत राहू नये असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यंमंत्र्यांना दिला.

हे देखील पहा -

अनिल देशमुख यांना शेवटी रात्री ईडीने अटक केली. सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर ते हजर झाले आणि त्यांना अटक झाली. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि यांना एक न्याय असं नागरिकांना काही दिवसांपासून वाटत होते. मात्र या अटकेमुळे सर्वसामान्य माणसाला यामुळे विश्वास वाढला. अजून काही जात्यात आहेत, काही सुपात आहेत.

ईडी आणि आयकर विभाग (ED and Income Tax Department) यांनी अजित पवार Ajit Pawar यांच्या संपत्ती सील केल्या आहेत. त्यामुळे त्या आता विकता येणार नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आपल्यासोबत कोण आहे हे पहावं, आणि राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जावं असं पाटील म्हणाले.

आम्ही आशावादी -

तसेच देगलूर विधानसभा निवडणूकीत काँग्रेस (Deglaur Assembly Election) आघाडीवरती आहे असं विचारलं असता पाटील म्हणाले 'आता कुठं 16 फेऱ्या झाल्या आहेत. अजूनही आम्ही आशावादी आहे. अजून 13 फेऱ्या आहेत.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, कोकणासह घाटमाथ्यावर कोसळणार जोरदार पाऊस

Success Story: त्सुनामित घर गेलं, शेतकऱ्याच्या लेकींनी जिद्दीने क्रॅक केली UPSC; एक IAS तर दुसरी IPS अधिकारी

Monday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या संसारात वाढणार गोडी गुलाबी; तर काहींचे होणार मतभेद, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT