Mumbai : "मलिकांच्या जावयाला आम्ही ड्रग्स विकायला सांगितलं होतं का?"

चूक तुम्ही करायची आणि आरोप आमच्यावर करायचा नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी.
Navab Malik
Navab MalikSaamTV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : पाच समन्स नंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) हजर झाले आहेत. ज्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांना अटक केलेली आहे. तसेच या पत्रामध्ये अन्य लोकांची देखील नावे होती नाव आहे त्यांची चौकशी व्हावी. असं वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

हे देखील पहा -

राणे म्हणाले '100 कोटी आम्ही वसूल करायला यांना सांगितले, यांच्या जावयाला आम्ही ड्रग्स विकायला सांगितले होते का? चूक तुम्ही करायची आणि आरोप आमच्यावर करायचा नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी. फोर सिजनमध्ये Four seasons पार्टी कशी होते हे त्यांनी त्यांच्या पर्यावरण मंत्र्याला विचारावे तिकडे काय चालायचे ते.' तसेच परमवीर सिंग Paramvir Singh कुणाचा लाडका, तुमची घाण साफ करताना तो हवा होता आता त्याच्यावर आरोप करतात आदित्य ठाकरे यांना माहीत नाही का? परमवीर सिंग कुठे आहे ? वर्षा बंगला, महापौर बंगला असेल येथे सगळ्यात जास्त परमवीर सिंग जायचा आणि आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्यासोबत मिटिंग करायचा असा आरोप देखील नितेश राणेंनी केला.

Navab Malik
Baramati : पवार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत - उद्धव ठाकरे

तुम्हाला तुमची घाण साफ करायला परमवीर सिंग लागतो मग आता विरोध का करता परमवीर सिंग यांच्या कार्यालयातील CCTV फुटेज चेक केलं तर त्याच्या ऑफिसमध्ये आदित्य ठाकरे बसून असायचे हे दिसेल सुशांतसिंग, दिशा सालीयनच्या बाबतीत काय झाले हे परमबिर सिंग यांना माहीत आहे असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. तसेच नायझेरियन लोकांना नवाब मलिक Navab Malik यांचा आशीर्वाद आहे. नवाब मलिक यांच्यात हिंमत असेल तर नायजेरियन वस्ती नष्ट करावी असं आव्हान देखील राणेंनी यावेळी मलिकांना दिलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com