Uddhav Thackeray reacts to alliance talks with Raj Thackeray during INDIA bloc meeting in Delhi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले, युतीबाबत इंडियाच्या अटी-शर्ती नाहीत'

Thackeray Brothers Together: उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून राज ठाकरेंसोबतच्या युतीवर महत्वाचं भाष्य केलंय... तर इंडिया आघाडीतील पक्षांनाही स्पष्ट इशारा दिलाय... उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Bharat Mohalkar

राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चेने जोर धरला होता. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर एकाच वाक्यात भाष्य केलंय....

खरंतर हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेस वगळता महाविकास आघाडीचे सर्वच घटकपक्ष एकत्र आले होते. मराठीच्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधुंनी एकीचा नारा दिला... तर काँग्रेसने राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतलीय.... त्यामुळेच दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात होती.. मात्र राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत इंडिया आघाडीच्या कुठल्याही अटी शर्ती नसल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलंय.. तर यावरुनच शिंदे सेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.

दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांनीही ठाकरे बंधु एकत्र आले तर मुंबई महापालिकेत त्यांना यश मिळेल, असा दावा केलाय.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक आहेत... त्यातच बेस्टच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केलीय.. त्यामुळे खडा टाकून दोन्ही ठाकरे मुंबई महापालिकेसाठी अंदाज घेत आहेत का? आणि बेस्टनंतर महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू युतीची घोषणा कधी करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT