Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला; उद्धव ठाकरेंचा टोमणा

Uddhav Thackeray News In Marathi: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला आहे.

Vishal Gangurde

Uddhav Thackeray On Eknath Shinde:

मुख्यमंत्र्यांच्या समुद्रात ट्रॅक्टर चालवण्यावरून राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत समुद्रात ट्रॅक्टर चालवल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. आमदार आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून निशाणा साधला आहे. 'समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे हे नागपुरात आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवाब मलिकांना दुसरा न्याय? उद्धव ठाकरे

'नवाब मलिक यांच्याबाबत एक लावणार असाल, तर तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांच्याशी करणार आहात का? त्यांचापासून अंतर ठेवणार आहात का? प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीशी व्यवहार केला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं की, काही लोक मिरचीचा व्यवहार करतात. तर काही लोक मिर्चीशी व्यवहार करतात. त्यामुळे मिर्चीबरोबर व्यापार केला, त्यांचाशी सत्तेचा व्यापार सुरु ठेवणार आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला : ठाकरे

'प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यांचावर कारवाई पुढे करणार आहात का? तुम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत गंभीर असाल, तर समुद्रावर ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला असेल. शेतकरी, लोकांच्या घरादारावर नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर, असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला असेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला आहे.

विम्याचा पैसा कुठे गेला? उद्धव ठाकरे

'सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत हे उदासीन आहेत. एका रुपयात विमा योजना आणली, यामुळे शेतकऱ्यांचा विमा घेण्याचा आकडा वाढला. त्यामुळे विम्याचा पैसा सरकारने भरला. त्या पैशाचं पुढं काय झालं? तो पैसा त्यांच्या मित्रांच्या खिशात गेला आहे का? हे त्यांनी सांगावं. नुकसान झाल्यावर ७२ तासांच्या आत सांगण्याचा नियम आहे. पण ७२ तासांनंतर विमा कंपन्यांचे फोन बंद आहेत. मग आठ हजार कोटी दिले आहेत, ते कुठे गेले आहेत? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT