Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: 'एकही पोलीस न घेता यावं; शिवसेना कोणाची सांगावं...' उद्धव ठाकरेंचे CM शिंदे, नार्वेकरांना थेट आव्हान!

Uddhav Thackeray Speech: लबाडाने नाही लवादाने जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालायत गेलोय. सरकार कोणाचे ही असो पण सत्ता ही जनतेची असायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

Gangappa Pujari

विनय म्हात्रे, मुंबई|ता. १६ जानेवारी २०२४

Shiv Sena Janata Nyayalaya:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने थेट जनतेच्या कोर्टात उतरण्याची तयारी केली आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनीही नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणालेत उद्धव ठाकरे?

"लबाडाने नाही लवादाने जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालायत गेलोय. सरकार कोणाचे ही असो पण सत्ता ही जनतेची असायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंद्यांनी यावं. एकही पोलीस न घेता यावं आणि तिथे शिवसेना कुणाची हे सांगावं मग जनता ठरवेल कुणाला पुरावा, कुणाला गाडावा आणि कुणाला तुडवावा," असे थेट आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले.

"मला तरं वाटत आपण निवडणूक आयोगावर खटला केला पाहिजे. निवडणुक आयोगात आपण  १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. मगं निवडणूक आयोग त्याच्या गाद्या करुन झोपले होते का? अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच एकतर ती प्रतिज्ञापत्रे स्विकारा किंवा आमचे पैसेतरी परत करा," अशी कोपरखळीही ठाकरेंनी यावेळी मारली.

मी पक्षप्रमुख नाही तर २०१९ साली अमित शाह (Amit Shah) युतीची चर्चा करण्यासाठी माझ्याकडे कशासाठी आले? फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद घेतले, ते कुणाच्या पाठिंब्यावर? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अब बाळासाहेब नहीं रहे, तो अब मैं उद्धव जी से बात करता हूँ, असे नरेंद्र मोदी काय म्हणाले, असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:परतवाडा आठवडी बाजारातील दुकानाला भीषण आग,लाखोंचे नुकसान

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT