Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Vinod Tawde Money Distribution : विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल

Vinod Tawde Money Distribution News : विनोद तावडे यांना विरारमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपामुळे बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय. याप्रकरणावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

Namdeo Kumbhar

Vinod Tawde Money Distribution : माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आज तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं. मविआचे सरकार येऊ दे, असे साकडे ठाकरेंनी यावेळी तुळजाभवानी चरणी घातले. तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विनोद तावडेंवर झालेल्या आरोपवर प्रतिक्रिया दिली. माझी बॅग आजही तपासली गेली. विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार..? असा थेट सवाल यावेळी ठाकरेंनी केला.

विरारमध्ये विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यांनी पाच कोटी वाटल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. त्याशिवाय त्यांच्याकडील डायरीमध्ये १५ कोटींची नोंद असल्याचा आरोपही ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले. या प्रकऱणावर उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप करत थेट सवाल केला.

माझी बॅग आजही तपासली गेली, विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार? नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्यावर दगड हल्ला झाला. दगड तपासण्याचं काम कोण करणार? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरेंनी तुळजापूर येथून उपस्थित केला.

ठाकरेंच्या आरोपाला प्रवीण दरेकरांचे उत्तर -

उद्धव ठाकरे यांच्यावर बहुदा आयोगाला संशय येतो. उद्धव ठाकरेंची बॅग तपासू नये असं संविधानात लिहिलेलं नाही. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांचे बॅग तपासल्या आहेत. निवडणूक आयोग आपलं काम करत आहे, असे दरेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT