Uddhav Thackeray faces a crucial numbers challenge ahead of the 2026 Maharashtra Legislative Council elections. Saam Tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? राजकारणात खळबळ

Political Uncertainty Grows Over Uddhav Thackeray: शिवसेनेतील फुटीमुळे मुख्यमंत्रिपद गेलेल्या उद्धव ठाकरेंची आता आमदारकीही जाण्याची शक्यता आहे... ती नेमकी कशी? विधानपरिषद निवडणुकीत विजयासाठी मतांचा कोटा नेमका कितीचा असणार आहे... आणि ठाकरेंना आकड्यांची जुळवाजुळव शक्य होऊ शकते का?

Bharat Mohalkar

राज्यातील विधानसभा, त्यानंतर पालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीची विजयी घोडदौड कायम आहे...मात्र याच यशानंतर आता आगामी विधानपरिषद निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापलंय... आणि त्याला कारण ठरलीय अपेक्षित संख्याबळ नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरची टांगती तलवार.... मे 2026 मध्ये उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेची टर्म संपतेय. त्यामुळे विधानपरिषदेची टर्म संपल्यानंतर ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी ठाकरेसेनेकडे अपेक्षित संख्याबळ नसल्यानं शिंदेसेनेनं ठाकरेंना डिवचलंय...

खरं तर मे 2026 मध्ये विधानपरिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय... यामध्ये उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हेंचा समावेश आहे...मात्र टर्म संपल्यानंतर पुन्हा आमदार होण्यासाठी ठाकरेंपुढं आव्हान आहे ते अपेक्षित संख्याबळाचं.... विधानपरिषद निवडणुकीत कोटा पद्धती आहे.... हा कोटा ठरतो तो विधानसभेचे एकूण आमदार आणि रिक्त होणाऱ्या जागांवर...

राज्यात सध्या 288 आमदार आहेत... तर विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत.. मतांचा कोटा ठरवताना रिक्त होणाऱ्या जागांमध्ये 1 ने वाढ केली जाते... त्यानंतर 288 ला 10 ने भागल्यास 28.8 म्हणजेच विजयासाठी 29 आमदारांची मतं मिळणं गरजेचं आहे... मात्र सध्या विधानसभेत भाजपचे 132, शिंदेसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41, एनडीएचे घटकपक्षाचे 5 आमदार आहेत.. तर महाविकास आघाडीत ठाकरेसेनेचे 20, काँग्रेस 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत.... मात्र ठाकरेसेनेकडे केवळ 20 आमदारांचंच संख्याबळ आहे... त्यामुळे ठाकरेंना आणखी 9 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे..

हेच समीकरण लक्षात घेऊन राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या विजयासाठीची रणनीतीच उघड केलीय.. आधीच विधानसभेला आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घसरलीय.. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मनधरणी करुन ठाकरे आकड्यांची जुळवाजुळव करुन विधानपरिषदेत पोहोचणार की धाडस न दाखवता निवडणुकीतून आधीच माघार घेणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran- Israel Conflict: इराण पेटलं! इस्राइलकडून तेलसाठ्यांवर हल्ला, तेहरानमध्ये अग्नितांडव; पाहा VIDEO

Kanji Vada Recipe: अमरावतीतला फेमस कांजी वडा बनवण्याची सोपी रेसिपी लगेचच घ्या जाणून, नाश्त्यासाठी बेस्ट डिश

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा 20 वा वर्धापन दिन

T20 World Cup Final चा इफेक्ट! अहमदाबादमध्ये हॉटेल दर 300-400 टक्क्यांनी वाढले, एका रात्रीसाठी 2.37 लाख रुपये

Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT