Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Politics: उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा! भुमरे-बोरनारेंचं टेंशन वाढणार? काय आहे ठाकरेंची नवी रणनीती? वाचा...

Uddhav Thackeray News: शिवसेनेतील फुटीनंतर आपला प्रभाव असलेल्या मराठवाड्यावर ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय. ठाकरेंच्या या दौऱ्याने कुणाचे धाबे दणाणले आहेत? जाणून घेऊ...

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केलंय. त्यातच शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत ठाकरेंकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

आधी आदित्य ठाकरेंचा मराठवाडा दौरा तर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आव्हान उभं केलंय. मात्र ठाकरेंची मराठवाड्यात ताकद किती? जाणून घेऊ...

ठाकरेंचं मिशन मराठवाडा

  • शिवसेनेच्या (Shiv Sena) 12 पैकी 3 आमदार ठाकरे गटाकडे आहेत.

  • संभाजीनगर वगळता परभणी, धाराशिव, हिंगोलीत लोकसभेला विजय.

  • संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), परभणी, धाराशिव, नांदेड (Nanded) आणि हिंगोलीतील मतदारसंघांवर प्रभाव.

मुंबई (Mumbai), कोकणानंतर ठाकरेंचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर याच मराठवाड्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) 4 पैकी 3 जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपला वरचष्मा कायम राखलाय.

तर विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) पक्ष फुटीने दुखावलेल्या ठाकरेंनी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे आणि पैठणमधून इच्छूक असलेल्या संदीपान भुमरेंचा मुलगा विलास भुमरेंच्या मतदारसंघात सभा घेत शिंदे गटाचं टेंशन वाढवलंय.. त्यामुळे विधानसभेला ठाकरे आपला मराठवाड्याचा (Marathwada) बालेकिल्ला राखण्यात यश मिळवणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

SCROLL FOR NEXT