Uddhav Thackeray during his Marathwada tour plays an old Devendra Fadnavis audio on the 7/12 loan waiver promise. Saam Tv
महाराष्ट्र

कर्जमाफीवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली, ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडीओ

Uddhav Thackeray Targets Fadnavis With Viral Audio: अस्मानी संकटाने पिचलेल्या बळीराजाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठावाड्याचा दौरा केलाय. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यावरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली आहे. ठाकरेंनी फडणवीसांवर काय निशाणा साधलाय ?

Girish Nikam

ऐकलंत...फडणवीसांनी गेल्या निवडणुकीच्या प्रचारात दिलेली ही घोषणा....आता याच कर्जमाफीच्या घोषणेवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. उद्धव ठाकरे नुकसानग्रस्तांच्या भेटीसाठी मराठवाड्यात दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेले आहेत...या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कर्जमाफीच्या मुद्यावर भर दिलाय. कर्जमाफीवरून ठाकरेंनी महायुती सरकारला घेरण्याची रणनीती आखलीय. उद्धव यांनी शेतकऱ्यांसमोर थेट लाव रे तो ऑडीओ म्हणत फडणवीसांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची क्लीपच ऐकवली....तर फडणवीसांनीही या दौऱ्यावरून ठाकरेंना टोला लगावलाय.

शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकारने कर्जमाफीसाठी तारीख जाहीर करत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंनी मात्र लगेच कर्जमाफीसाठी आग्रह धरलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं बिगूल वाजलंय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरूनच ही निवडणूक गाजणार असल्याचं दिसतंय एवढं मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial: तेजश्री प्रधान आणि रेश्मा शिंदेच्या मालिकेत रंगली स्पर्धा; कोणती मालिका ठरली प्रेक्षकांची फेव्हरेट? पाहा TRP यादी

Nashik : नाशिक हादरले! जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

Smartphone Tips : मोबइलवर कॉल आला, गाणी वाजली, पण आवाज कमी येतोय; काही सेकंदात असा करा प्रॉब्लेम सॉल्व्ह

भारताची मान जगात उंचावली! वैभव जैन यांनी 'The Button' मधून दिला भविष्याचा मंत्र, AI चांगलं की वाईट जगाला सांगितलं

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

SCROLL FOR NEXT