uddhav thackeray news Saam tv
महाराष्ट्र

सत्ताधाऱ्यांचा डाव उधळला? उद्धव ठाकरे आणि खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

maharashtra political News : उद्धव ठाकरे आणि खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंनी खासदारांची समजूत काढल्याचे सांगितले जात आहे.

Vishal Gangurde

उद्धव ठाकरे यांची खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली

ठाकरेंच्या खासदारांनी पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती

उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोल करत काढली समजूत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरही राज्यातील राजकीय घडामोडी थांबेना झाल्या आहेत. निवडणुका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर हाती घेतल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे नाराज खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या चर्चेनंतर नाराज खासदारांची संजय राऊत यांच्या घरी बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी रविवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी खासदारांनी नाराजी दूर करत डॅमेज कंट्रोल केल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर रविवारी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत खासदार अनिल देसाई, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह ठाकरेंचे खासदार उपस्थित होते. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही बैठक झाली. या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. या बैठकीत ठाकरेंनी खासादारांची समजूत काढून सत्ताधाऱ्यांच्या डाव उधळल्याचंही सांगितलं जात आहे.

खासदारांच्या तक्रारी काय होत्या?

उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नसल्याची तक्रार होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदत मिळाली नाही. पक्ष नेतृत्वाने प्रचार केला नाही. आदित्य ठाकरे फारसे महाराष्ट्रात फिरले नाही, अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासदारांनी समजूत काढली. ठाकरेंनी समजूत काढल्याने डॅमेज कंट्रोल यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

बैठकीनंतर खासदार सावंतांची शिंदे सेनेवर टीकास्त्र

ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावून खासदारांच्या तक्रारी समजून घेतल्या. त्यानंतर ठाकरेंनी खासदारांची समजूत काढली. पक्षातील विसंवादावर बैठक झाल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सावंत यांनी शिंदे सेनेवर टीका केली. 'ऑपरेशन टायगरबद्दल बोलणाऱ्यांचं दिल्लीत जाऊन म्याव होतं, अशा शब्दात खासदार सावंत यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT