Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly winter session : 'मी मुख्यमंत्री होतो अन् फडणवीस विरोधी पक्षनेते...'; भुजबळांचं नाव घेत उद्धव ठाकरेंकडून आमदारांना कानमंत्र

Uddhav Thackeray Latest News : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले आहेत. नागपुरात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांना मार्गदर्शन केलं.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : विधानसभेत महायुतीचे २०० हून अधिक आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ५० पेक्षा कमी आमदार आहेत. महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर सरकारचं कामकाज वेगाने सुरु होईल. या सत्ताधाऱ्यांच्या चुकांकडे महाविकास आघाडीच्या आमदारांचं लक्ष असणार आहे. बलाढ्य महायुतीला कोंडीत कसं पकडावं, हे महाविकास आघाडीपुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे अधिवेशनात महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीचे आमदार कसे सामोरे जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, नागपुरात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांना कानमंत्र दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणी सांगून आमदारांना मार्गदर्शन केलं.

नागपुरात ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटाची बैठक झाली. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीसह इतर आमदार बैठकीला हजर होते. विधिमंडळात कामकाज करण्यासंदर्भात आयोजित शिबारात उद्धव ठाकरेंनी आमदरांना मार्गदर्शन केलं.

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आमदारांना सांगितलं की, 'काही लोक आपल्यासोबत आहेत. काही लोक गेले आहेत. आज विषय गंभीर असला तरी सभागृहात बाजू मांडता येऊ शकते. तुम्ही २० जण असला तरी कमी समजू नका. छगन भुजबळ एकटे असतानाही सभागृह डोक्यावर घेतले होते. ही ताकद होती. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. संधीच सोनं करा ही ताकद विधानसभा अधिवेशनात आहे'.

'अधिवेशनात एकाने चांगले काम केलं तर दुसऱ्याला हिंमत मिळते. तुम्ही विधानसभेत मिळणारी पुस्तक घ्या, नियमावली समजून घ्या. त्यांच्याकडे संख्याबळ खूप असलं तरी त्यांच्याकडे नाराजी देखील खूप आहे. तुम्ही मात्र एकजुटीने राहा. आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही. या आधी शिवसेनेच्या इतिहासात पाहिलं तर वामनराव महाडिक असतील किंवा छगन भुजबळ असतील हे सभागृहात एकटे आमदार असताना सर्वांना भारी पडत होते. आपण असे सभागृह डोक्यावर घेणारे आमदार दिलेत, अशी शब्दात उद्धव ठाकरेंनी आमदारांना कानमंत्र दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकर उलटला, मोठ्या प्रमाणात गॅसगळती, १६ तासांपासून महामार्ग ठप्प, पाहा व्हिडिओ

Ajit Pawar Death: 'अजितदादांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग?', खासदाराच्या विधानाने खळबळ

NCP: राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी कुणाची मध्यस्थी?, महाराष्ट्राच्या माजी मंत्र्यांचे खळबळजनक दावे

Homemade Energy Drinks Recipe: घरच्या घरी बनवा 5 प्रकारचे 'एनर्जी ड्रिंक्स', थकवा कायमच निघून जाईल

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याच्या आईला कारने उडवले, CNG पंपावरील व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT