eknath shinde and uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

'आमच्या पायाखालची वाळू...';मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे

दीपक क्षीरसागर

Neelam Gorhe News : 'आमच्या पायाखालची वाळू सरकण्याचा काही प्रश्न येत नाही. मात्र वाळूचा किल्ला कोणी बांधलाय हे काळ ठरवेल. वाळूचा किल्ला एका लाटेमध्ये वाहून जाऊ शकतो, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) पुढे म्हणाल्या, 'जनतेचं प्रेम अभेद्य आहे. त्यामुळं कोणी जरी इकडे तिकडे हललं असलं तरी फरक पडत नाही, हे देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. 'निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक केसला तारीख पडतेय आणि निवडणूक आयोगावरतीच सर्वोच्च न्यायालय प्रश्नचिन्ह विचारत आहे. त्यामुळे कुणाचा कायदा चालतोय हे अदृश्य आहे. कायदा चालवणारा कळत नाही, असेही गोऱ्हे म्हणाल्या.

सायकल ट्रॅकच्या प्रश्नावर गोऱ्हे म्हणाल्या, 'मुंबई येथील सायकल ट्रेकचा प्रश्न हा बीएमसीचा अंतर्गत प्रश्न आहे. या कंत्राटदाराला बीएमसीने ब्लॅक लिस्ट केलं, तरी नागपूर महानगर पालिकेने कामे दिली आहेत. सरकारने याची सखोल चौकशी करावी सत्य समोर येईल, असं देखील यावेळी नीलम गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर बुलढाण्यात जोरदार टीका केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'आमच्या सरकारकडून जनतेच्या कामांना प्राधन्य दिले जात आहे. त्यामुळे जनता आमच्या सरकारवर समाधानी आहे. त्यामुळे विरोधी गटाकडून सरकारवर फक्त टीका होत आहे. आम्ही केलेल्या कामामुळे आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचे पाहून उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT