kalyan Saam tv
महाराष्ट्र

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

uddhav thackeray : कल्याणमधील बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे बेपत्ता नगरसेककांचं टेन्शन वाढलं आहे.

Vishal Gangurde

केडीएमसीतील चार नगरसेवकांवर ठाकरे गटाने कारवाईचा इशारा दिलाय

पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय

निलंबनानंतर पोटनिवडणुकीचे स्पष्ट संकेत ठाकरे गटाने दिलेत

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने उबाठा गट आक्रमक झाला आहे. या चार नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधित चार जागांवर पोटनिवडणूक होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आज ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत चारही नगरसेवकांचे निलंबन आणि त्यानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या शक्यतेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी गटनेते उमेश बोरगावकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाच्या आदेशानुसार दोन ते तीन महत्त्वाच्या बैठकींना हे नगरसेवक गैरहजर राहिले. त्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही.

मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक असल्याने पक्षाची शिस्त पाळणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. ते स्वतःहून गायब झाले की त्यांना कुणी नेले, याचा खुलासा लवकरच होईल. शहरात चर्चा आहे की राजू पाटील यांनी आमचे दोन सदस्य नेले असून, त्यांच्या नातेवाईकांनी तसे सांगितले आहे. राजू पाटील यांनीही ते मान्य केल्याचे बोलले जात आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.

पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आल्यावर इतर पक्षाचे आदेश मान्य करता येत नाहीत. मैत्री वेगळी बाब आहे, पण पक्षांतर केल्यास त्यावर कारवाई निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोटनिवडणूक हा एक ठोस पर्याय असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे केडीएमसीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. चारही नगरसेवकांवर आता निलंबनाची टांगती तलवार लटकत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

Weather Update: पुढील १० तासात कोसळणार धुव्वाधार पाऊस; १५ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

मुंबई-पुण्यापेक्षा सोलापूर-मुंबई प्रवास सुसाट! 400 किमी प्रवास फक्त एक तासांत

SCROLL FOR NEXT