Uddhav Thackeray Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारची इमोशनल पोस्ट; काहीतरी मोठं घडतंय...

Bhaskar Jadhav News: उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि कोकणातील गुहागर मतदारसंघाचे आमदार यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहलं आहे.

Satish Daud

Bhaskar Jadhav Latest Marathi News

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे नाराज होऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. इतकंच नाही, तर ४० आमदारांनासोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. शिंदे कधी ठाकरेंची साथ सोडणार, अशी कल्पना शिवसैनिकांच्या मनातही नव्हती. आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि कोकणातील गुहागर मतदारसंघाचे आमदार यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केलं आहे. तसेच उद्या (१० मार्च) सकाळी ११ वाजता भास्कर जाधव हे चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? अशा चर्चा कोकणातील राजकारणात सुरू झाल्या आहेत.

भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

"आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात".

"अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात", असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

"तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरुपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून रानावनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही".

"या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्षे सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय", असेही त्यांनी नमूद केले आहे.

भास्कर जाधव शिंदे गटात प्रवेश करणार?

"आम्ही गुवाहाटीला होतो तेंव्हाच भास्कर जाधव बँग भरुन तयार होते. एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत आणि मला विचारलं की भास्कर जाधव यायला तयार आहेत. आम्ही त्यावेळीच भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती नको, अशी भूमिका मांडली होती, आता त्यांना कुणी स्विकारणार नाही, असं रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muktagiri Waterfall: विकेंडचा प्लान बनला नसेल तर अमरावतीच्या 'या' धबधब्यावर भिजायला जा!

Shocking News: वेड्यासारखं प्रेम... रुग्ण तरुणीचा मृत्यू; पुरलेला मृतदेह घरी आणून ७ वर्षे सोबत राहिला डॉक्टर

Kamali: कमळी मालिकेत नवा ट्विस्ट; थिएटरमध्ये कमळीची छेड काढल्यामुळे ऋषीचा संताप अनावर, दोघांच्या नात्याला मिळणार नवे वळण

Voter List Scam: महाराष्ट्र, कर्नाटकानंतर केरळातही घोळ; एकाच पत्त्यावर ९ जणांची बनावट मतदार नोंदणी

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

SCROLL FOR NEXT