Maharashtra Political  Saam, tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाची फिल्डिंग; दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरला

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, मुंबई

Shivsena Political News in Marathi:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भूमिकेला खासदार राहुल शेवाळे यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. खासदार शेवाळे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन ठाकरे गटाचा विरोध ओढावून घेतला आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात उमेदवार निश्चित केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने अनिल देसाई यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मागील दोन आठवड्यांपासून मातोश्रीवर सुरु असलेल्या बैठकीनंतर अखेर अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या उमेदवारीवर पक्ष नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या पक्षांतर्गत कुरबुरीच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे अरविंद सावंत यांना दक्षिण मध्य मुंबईमध्ये हलवून अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईतून उतरवायचं का, असाही विचार पक्षनेतृत्वाकडून सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

एप्रिल 2024 मध्ये अनिल देसाई यांची राज्यसभा खासदारकीची टर्म संपत आहे. तसेच 16 आमदारांच्या संख्येच्या जोरावर देसाईंना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्याबाबत पक्षनेतृत्व साशंक असल्याने अनिल देसाईंना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच, शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात युवा सेने नेते अमोल कीर्तिकर यांनी ऐनवेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्याबाबत असमर्थता दर्शविल्यास सुनील प्रभू किंवा प्रियांका चतुर्वेदी यांचा बॅक अप प्लान म्हणून विचार सुरु असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT