Guhagar Political News  Saam tv
महाराष्ट्र

BJP Vs Thackeray Group Clash : गुहाघरमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर मोठा राडा; निलेश राणेंच्या कारवर दगडफेक

Guhagar Political News in Marthi : गुहाघरमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा झाला आहे. गुहाघरमध्ये भास्कर जाधव समर्थकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Guhagar Political News In Marathi :

गुहाघरमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर मोठा राडा झाला आहे. गुहाघरमध्ये भास्कर जाधव समर्थकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुहाघरमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीनंतर भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्याचेही समोर आलं आहे.

या दोन्ही कार्यकर्त्यांनी भांडणानंतर जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूराच्या कांड्या फोडल्या. (Attack On Nilesh Rane's Cars)

नेमकं काय घडलं?

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा आहे. राणे यांच्या या सभेला भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. भास्कर जाधव यांचे कार्यालय मुंबई-गोवा मार्गावर असल्यामुळे राणे यांच्या कारचा ताफा भास्कर जाधव यांच्या कार्यलयासमोरूनच जाणार होता. यामुळे राणे यांच्या ताफ्यातील कार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर उभ्या केल्यामुळे भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वादानंतर निलेश राणे यांचं आगमन झालं. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यावरील कारवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. निलेश राणेंच्या या सभेपूर्वीच वातावरण तापल्याचं समोर आलं आहे.

भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया

भास्कर जाधव म्हणाले, 'निलेश राणे जाणीवपूर्वक माझ्या ऑफिस समोर आले. पाग नाक्यामध्ये जाणिवपूर्वक त्यांनी सत्कार केला. तो घराकडे जाण्या-येण्याचा रस्ता आहे. सत्कारासाठी नाक्यावर लावण्यात आलेली क्रेन जाणिवपूर्वक माझ्या ऑफिससमोर आणण्यात आली.

'आम्हाला जाणूणबुजून रस्त्यावरुन चालत येऊन हातवारे करुन उसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून दगडफेक झाल्यानंतर दगडफेक झाली. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरुन मिरवणूक काढू द्यायला नको होती, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT