Uddhav Thackeray, Sharad Pawar, Balasaheb Thorat Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना हवं बिहार मॉडेल? जागावाटपाचाही दिला नवा प्रस्ताव, काय आहे सत्तेचं हे मॉडेल? वाचा...

Uddhav Thackeray in Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरे यांना याबाबतीत बिहार मॉडेल हवं आहे. नेमकं काय आहे हे मॉडेल, ते जाणून घेऊ...

Saam Tv

भरत मोहोकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुक तोंडावर आल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावलाय. तर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे. त्यातच बिहार मॉडेलनुसार मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव ठाकरे गटाने मांडल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर नव्या प्रस्तावानुसार ठाकरेंनी एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवलीय. मात्र हा प्रस्ताव काय आहे? जाणून घेऊ..

ठाकरेंकडून जागावाटपाचा नवा प्रस्ताव?

नाना पटोले

काँग्रेस - जागा 105

उद्धव ठाकरे

ठाकरे गट - 95 जागा

शरद पवार

राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 88 जागा

महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसकडून 125 जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही 100 पेक्षा अधिक जागांची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीतच ठाकरेंनी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेत बिहार मॉडेलनुसार मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर यापुर्वीच संजय राऊतांकडून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचं म्हटलंय. दुसरीकडे काँग्रेसनेही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितलाय.

काय आहे सत्तेचं बिहार मॉडेल?

2020 विधानसभा निवडणुकीत जदयू ने 141 तर भाजपने 102 चा फॉर्म्युला निश्चित करत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला 43 जागांवर, भाजपचा 73 जागांवर विजय मिळाला होता. जागा कमी असतानाही नितीश कुमारांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. याच मॉडेलची आता मविआत चर्चा हात असायची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यातच एका सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, ''मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरेच आहेत.'' तर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, असं वाटतंय. यात आश्चर्य वाटायचे कारण नाही.''

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद हवेच हा आग्रह नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र उद्धव पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी कमी जागा घेण्याची तयारीही ठाकरेंनी दर्शवलीय. मात्र हे बिहार मॉडेल काँग्रेस आणि पवारांना मान्य होणार का? याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT