uddhav thackeray faction morcha on gadhinglaj government office saam digital
महाराष्ट्र

Kolhapur: गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी कार्यालयावर उद्धव ठाकरे गटाचा माेर्चा, आंदोलक- पोलिसांत शाब्दिक चकमक; नेमकं काय घडलं?

uddhav thackeray faction morcha on gadhinglaj government office : जोपर्यंत चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

चंदगड तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन कायमस्वरूपी बंद करावे या व आदी मागण्यांसाठी आज (शुक्रवार) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त्यांनी काेल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. या माेर्चात महिला कार्यकर्त्या देखील सहभागी झाल्या हाेत्या.

हा माेर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली काढण्याच आला. यावेळी माेर्चेकरांनी गडहिंग्लज कार्यालया बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान माेर्चेकरांचे निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी आंदाेलनस्थळी न आल्याने मोर्चाकरांनी प्रांत कार्यालय परिसरात ठिय्या मारला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे मोर्चेकरांच्या हातातील फलक देखील लक्षवेधी होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT