Chandrhar Patil joins Shinde Sena : Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, सांगलीचा शिलेदार साथ सोडणार, उदय सामंतांनी दिले संकेत

Chandrhar Patil joins Shinde Sena : सांगलीतील शिवसेना उद्धव गटाचे नेते चंद्रहार पाटील शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray setback : विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. सांगलीमधील चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत. सांगली येथील कार्यक्रमात चंद्रहार पाटील यांनी सामंत यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. त्यानंतर चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

चंद्रहार पाटील यांनी आमच्या गळ्यात हार घातला. पण चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात एकनाथ शिंदे हे कधी हार घालायचं हे चंद्रहार पाटील यांनी ठरवावं, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले. त्यामुळेच लवकरच चंद्रहार पाटील शिंदेंच्या गोटात दाखल होणार असल्याचे बोलले जातेय. लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटलांसाठी ठाकरेंनी काँग्रेससोबत वाद घातला होता. सांगलीची जागा खेचून आणली होती, आज तेच चंद्रहार पाटील साथ सोडणार असल्याचे दिसतेय.

उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी गुरूवारी सांगलीच्या विटामध्ये उदय सामंत यांची भेट घेऊन चांदीची गदा भेट दिली. त्याचप्रमाणे यथोचित त्यांचा सत्कार केला. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे गटात जाणार का अशी राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागली आहे. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटलांनी घेतलेल्या बैठकीमुळे चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार अशल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले.

डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित मानला जात आहे. सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी चंद्रहार पाटलांकडून मंत्री सामंत यांना चांदीची गदा देखील भेट देण्यात आली.

चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार होते. तर गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहे, या सर्वच पार्श्वभूमीवर पैलवान चंद्रहार पाटील यांच्या भाळवणी गावात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम,हा चंद्रहार पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

SCROLL FOR NEXT