Uddhav Thackeray Speech  Saam Tv
महाराष्ट्र

आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटताय?, ठाकरेंचा भाजपला सवाल | Uddhav Thackeray News

Uddhav Thackeray Speech : आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय?', असा सवाल ठाकरेंनी भाजपला केला.

Satish Daud

Uddhav Thackeray News : "मी काँग्रेसबरोबर गेल्यावर हिंदुत्व सोडलं असेल, तर मुफ्ती मोहम्मद सैद यांच्यासोबत तुम्ही काश्मीरात मांडीला मांडी लावून बसलात, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं. तुम्ही म्हणाल तोच हिंदू आणि तुम्ही म्हणाल तोच देशद्रोही अशी तुमची वृत्ती असेल, तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे', असा इशारा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.  (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर 'वज्रमूठ सभा' होत आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानावर या सभेला सुरूवात झाली. या सभेला संभोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीवरून वार करतो? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही घट्ट झालो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं. (Maharashtra Political News)

'अमित शहांनी पुण्यात म्हटलं की सत्तेसाठी मी तळवे चाटले. असं नाहीये की मी शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. पण मी फक्त एवढंच म्हणालो, की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय?', असा सवाल ठाकरेंनी भाजपला केला.

"भाजपाचं (BJP) म्हणजे दिसला भ्रष्ट, घेतला पक्षात असं चाललं आहे. देशभरातली बरीच भ्रष्ट माणसं या पक्षात आहेत. जर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत असाल, तर पक्षाचं नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी असं ठेवा", अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

"मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथे मी हिंदुत्व सोडलंय. मी आत्ता इथून घरी जाऊन बसेन, तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही", असं खुलं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT