Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

आक्रोश सत्ता गेली म्हणून होता, पाण्यासाठी नव्हता; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आज मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला, त्यांच्या हा मोर्चा पाण्यासाठी नव्हता, त्यांचा हा मोर्चा सत्ता गेली म्हणून होता, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील बहुचर्चित सभेला सुरुवात झाली आहे. ही सभा औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे राज्यभरातून सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.

दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे कोणावर निशाणा साधणार तसेच औरंगाबादच्या नामांतरावरही मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहीले आहे.

जर तुमत्यामध्ये प्रमाणिकपणा असेल तर नुसतं नामांतर नाही तर संभाजी राजेंना अभिमान वाटेल असं शहर तयार करायचं आहे. नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहीजे. संभाजीनगर नाव करणार हे वचन बाळासाहेबांनी दिलं आहे ते पुर्ण करणार, विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राने का अडवून ठेवला, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकला तो आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे, उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. मी पाणी प्रश्नावर बोलणार आहे, पाठ न दाखवता पाणी प्रश्न असतानाही मी जनतेसमोर जातोय, हा प्रामाणिक पणा आहे.

शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT