उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार Saam TV
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार

विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी निमंत्रण पत्रिका वाचून दाखवली.

अनंत पाताडे

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी निमंत्रण पत्रिका वाचून दाखवली. निमंत्रण पत्रिकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि अनेक आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे दुसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या अगोदर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी कुडाळ येथे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील बहुचर्चित विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आज या संदर्भात पाहणी करून आढावा घेतला हा कार्यक्रम जाहीर नसून फक्त निमंत्रितांसाठी असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

कोविड पार्श्वभूमीवर हजारो लोकांच्या उपस्थित जाहीर कार्यक्रम करता येणार नाही. कोरोना पूर्णता गेलेला नाही, त्यामुळे निमंत्रितांच्या उपस्थित कार्यक्रम होणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. प्रोटोकॉल प्रमाणे सर्वाना निमंञण मिळेल. एकच नाही तर चार ते पाच विमान यावीत आणि सिंधुदुर्गाचं विमानतळ जागतीक दर्जाच होईल हा प्रयत्न करणार असल्याते सामंत म्हणाले. पर्यटन जिल्हा असल्यामुळे जास्तीत जास्त विमानतळ आणण्याचा प्रयत्न आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

SCROLL FOR NEXT