Uddhav Thackeray-Eknath Shinde vidhimandal photo session Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray-Eknath Shinde : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, दोघांत फक्त एका खुर्चीचं अंतर

Uddhav Thackeray-Eknath Shinde vidhimandal photo session : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये एकत्र आले आहेत. या दोघांमध्ये फक्त एका खुर्चीचं अंतर होतं.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याच अधिवेशनात आज बुधवारी अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभ झाला. या समारंभानंतर झालेल्या फोटोसेशनसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फक्त एका खुर्चीचं अंतर होतं. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा फोटोसेशनसाठी एकत्र आले. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे प्रमुख एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाने अंबादास दानवे यांच्याकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद सोपवलं होतं. अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज बुधवारी संपला. त्यानंतर अंबादास दानवेंच्या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी एकत्र फोटोसेशन केलं. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे फोटोशूटसाठी एकत्र आले. त्यावेळी दोघांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं

अंबादास दानवे यांच्या फोटोसेशनसाठी ठाकरे आणि शिंदे एकत्र आल्याचे दिसून आले. यावेळी ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्याचा आग्रह नीलम गोऱ्हे यांनी केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं. तर यावेळी एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्याकडे कानाडोळा केला. दोघे आजूबाजूला उभे राहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसून आले. फोटोसेशनदरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फक्त एकाच खुर्चीचं अंतर होतं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नीलम गोऱ्हे बसल्या होत्या.

फोटोशेसननंतर ठाकरे काय म्हणाले?

विधानपरिषदेत शिंदेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझं वडील आणि आजोबांची परिस्थिती कशी होती, त्यांना माहिती आहे. ज्यांना त्या सोन्याच्या चमच्यांनी भरवलं. त्यांनी त्याच अन्नाशी प्रतारणा केली. हे पाप जनता विसरू शकणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT