congress ncp bjp logo 
महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉग्रेस की कॉग्रेस? भवितव्य भाजपाच्या हाती

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्णयावर सारे अवलंबून आहे.

संभाजी थोरात

सातारा : राज्यातल्या सत्तेत एकमेकांबरोबर असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील कराड सोसायटी मतदार संघात एकमेकांविरोधात उभे आहेत. विशेष म्हणजे या संघर्षात भाजपा ज्याच्या बाजूने आपलं मत टाकेल त्याच पारडं जड होणार आहे. त्यामुळे राज्याचे सहकार मंत्री आणि माजी सहकार मंत्र्याचा गट यांच्या संघर्षात भाजपाच्या भूमिकेला महत्व आलं आहे. satara dcc bank election 2021 atul bhosale balasaheb patil udaysinh patil karad

राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष आहे ते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत त्या कराड सोसायटी मतदारसंघराकडे. या मतदारसंघात नेहमी माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर याचं वर्चस्व होत. नुकतंच त्यांच निधन झाल्याने आता त्यांचे पुत्र, कॉग्रेस नेते उदयसिंह पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. एका- एका मतासाठी दोन्ही उमेदवार धडपडत आहेत. या मतदारसंघात भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांचीही ताकद आहे. त्यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही, मात्र या मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या भूमिकेला महत्व आहे. ते ज्या बाजू कौल देतील त्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉग्रेस यांच या मतदारसंघातील भवितव्य भाजपाच्या हातात आहे.

भाजप काय भूमिका घेणार सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपनेही ही चुरस पाहून आपले मतदार सहलीवर पाठवले आहेत. दरम्यान या मतदारसंघात आमची भूमिका निर्णायक आहे. मात्र आमचे नेते, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. अद्यापही त्यांचा कोणताही आदेश आलेला नाह असे भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT