udayanraje bhosale, Irma Yojna, Farmers saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : सरकारचे अभिनंदन करत उदयनराजेंनी पुन्हा त्यांची तीच मागणी लावून धरली...

Udayanraje Bhosale Latest Marathi News : राज्य सरकार वेगवान, धाडसी निर्णय घेत असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतक-यांच्या हितासाठी ईर्मा योजना लागु करावी अशी मागणी खासदार उदयनराजे भाेसले यांनी केली आहे. तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचार नागरिकांना मोफत करावेत या मागणीस मान्यता दिल्याने राजेंनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. (Maharashtra News)

राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या हिताचा मोफत उपचाराचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याबद्दल शासनाचे आम्ही जनतेच्या वतीने अभिनंदन करुन आभार मानतो असे उदयनराजेंनी म्हटलं आहे.

आम्ही सर्वप्रथम कृषीरत्न कृषी भूषण डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या समवेत भुमाता दिंडीच्या माध्यमातुन इर्मा याेजनेची केली. शेतक-यांना पिक लागवडीच्या खर्चासह उत्पन्नाची हमी देणारी ही योजना अंमलात आणावी अशी अपेक्षा राजेंनी व्यक्त केली आहे.

उदयनराजे म्हणाले शासकीय रुग्णालयातुन मोफत उपचार झाले पाहिजेत राज्यातील गोरगरिब तसेच सर्वच लोकांना कोणताही भेदभाव न करता उपचार मिळाले पाहिजेत या आमच्या मागणीला मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे यश आले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रीमंडळ त्रिवार अभिनंदनास पात्र ठरले आहेत असेही राजेंनी म्हटलं आहे.

राज्य सरकार वेगवान आणि धाडसी निर्णय घेत आहेच त्याच बरोबरीने मोठया प्रमाणात लोकहिताच्या विकास कामांना निधी उपलब्ध करुन देत आहे. महिला भगीनींसाठी 50 टक्के मोफत एसटी प्रवास योजनेचा माता भगिनींना चांगला लाभ मिळत आहे. महिला सक्षमीकरणासाठीही या निर्णयाची जोड मिळत आहे.

आता सर्वांनाच शासकीय रुग्णालयातुन मोफत वैद्यकिय उपचाराचा घेतलेला निर्णय निश्चितच सर्वसामान्य, गोरगरिबांसह राज्यातील सुमारे 60 टक्के लोकसंख्येला लाभदायी ठरणारा आहे.

याचप्रकारे शेतकरी हिताचा निर्णय ईर्मा योजना लागू करण्याचा आणि शेतीला उदयोगाचा दर्जा देणेबाबत घ्यावा अशी अपेक्षा उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. यथावकाश तथापि लवकरच असा निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे. या निर्णयामुळे शेतात राबणा-यां हातांमध्ये उत्पादन खर्चावर आधारित शेती उत्पन्नाची हमी मिळण्याबरोबरच ख-या अर्थाने राज्यशासन एक वेलफेअ स्टेट म्हणून नव्या दृष्टीकोनामधुन ओळखले जाईल अशा भावना उदयनराजेंनी (udayanraje Bhosale) व्यक्त केल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT