Udayanraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: राजवाड्यात मोठी चोरी झाली होती...; वाघनखं खरी की खोटी? उदयनराजेंनी सांगितला चोरीचा इतिहास

Udayanraje Bhosale On Waghnakh: वाघनाखांवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

लंडन येथे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी करार करून छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणली जाणारा आहेत. वाघनखं नेमकी केव्हा येतील याची तारीख अद्याप समजू शकलेली नाही. वाघनखांवरून राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. ही वाघनखे खरी आहेत की खोटी यावर भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेंनी इतिहासाची आठवण करून दिली आहे. (Latest Marathi News)

खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वाघनखे खरी आहेत की खोटी आहेत यावर त्यांना प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले की, त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे खरं की खोटं हे मी कसं सांगू शकतो.

याच प्रश्नाचे उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, पूर्वी आमच्या राजवाड्यात फार कमी लोक राहात होते. आम्ही सर्वजण अदालतवाड्यात राहयचो. त्यावेळी राजवाड्यात मोठी चोरी झाली होती. सोन्याच्या देवांसह अनेक मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या होत्या. त्यावेळी वस्ती देखील कमी होती आता आजुबाजूच्या परिसरात वस्ती वाढली आहे. त्यामुळे मला हा प्रश्न विचारून काहीच उपयोग नाही, असं उदयनराजेंनी म्हटलं.

वाघनखांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊतांनी देखील सरकारवर वाघनखांवरून घणाघाती टीका केली आहे. ही वाघनखे खरी आहेक का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीला देखील महाराष्ट्रात आणले जाणार आहे. याबाबत वस्तूसंग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच तलवार परत आणली जाणर असल्याचं, सुधीर मुनगटीवारांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT