udayanraje bhosale and chhatrapati sambhaji maharaj saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale: धाडस असेल तर समाेर या! संभाजी महाराजांची बदनामी करणा-यांना उदयनराजेंचे आव्हान

ओंकार कदम

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (shivjayanti) आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त (udayanraje bhosale birthday) उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) मित्र समुहातर्फे साता-यात (satara) विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. साेमवारी येथील गांधी मैदानावर शिवजन्मोत्सव - २०२२ राजधानी सातारा या कार्यक्रमांतगर्त राज्याभिषेक व शिवजागर सोहळा या कार्यक्रमात उदयनराजेंनी छत्रपती शिवरायांचे (chhatrapati shivaji maharaj) व छत्रपती संभाजीराजेंचे (chhatrapati sambhaji maharaj) आदर्शवत असणारे विचारच या जगाला तारू शकतात असे म्हटलं. तसेच अफाट शक्ती व युक्तीच्या जोरावर छत्रपतींनी उभारलेले हिंदवी स्वराज्य त्यासाठी मावळ्यांनी दिलेला लढा व केलेला त्याग आजच्या व पुढील पिढीला युगान युगे ज्ञात असणे गरजेचे आहे असेही नमूद केले. दरम्यान काही लाेकांनी छत्रपती संभाजी महाराज यांची नाहक बदनामी केल्याची खंत राजेंनी यावेळी व्यक्त केली. (udayanraje bhosale latest marathi news)

उदयनराजेंनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर झालेल्या बदनामीचा आणि क्षडयंत्राचा निषेध नाेंदविला. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणा-यांनी व्यासपीठावर येऊन चर्चा करावी असे आव्हान उदयनराजेंनी दिले.

छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम करण्याचे काम का केलं गेलं हे उलगडत नसलं तरी त्यांच्याबाबत विकृती असणा-यांनी धाडस करुन समाेर यावे आणि चर्चा करावी असे उदयनराजेंनी नमूद केले.

Eidted By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT