Two youths died felling a tree in Sawantwadi while returning from Ganpati Bhajan Saam TV
महाराष्ट्र

Sawantwadi News: गणपतीजवळ भजनासाठी गेले, परतत असताना नियतीनं डाव साधला; दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू

Satish Daud

विनायक वंजारे, साम टीव्ही

Sawantwadi Latest News

राज्यात सध्या गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात असून अनेक गणपती मंडळाजवळ भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. अशातच गणपतीच्या भजनावरून परतत असताना अंगावर झाड कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावंतवाडीच्या राजवाडा परिसरात घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी, अशी मृत तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही तरुण मंगळवारी गणपतीच्या भजनासाठी सावंतवाडीत (Sawantwadi) आले होते. रात्री ११ वाजता भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकीने घरी परतत होते.

दरम्यान, दुचाकीवरून जात असताना राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर त्यांच्या दुचाकीवर भलेमोठे भेडले माडाचे झाड कोसळले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी पालिकेचा बंब आणि रुग्णवाहिका दाखल झाली. पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर कटरच्या साह्याने दोघाही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दोघाही तरुणांचे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT