Wardha Accident News, Wardha News, sawangi  saam tv
महाराष्ट्र

Wardha Accident News : वेगवान कार झाडावर आदळली; जीवलग मित्रांनी गमावला जीव

हा अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : भरधाव वेगात असलेल्या कारवरून चालकाचा नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आमला (amla village near wardha) गावानजीक झाला. अक्षय कावलेकर (३२ रा. वायफड), नामदार पठाण (३३ रा. दहेगाव मिस्कीन) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी (sawangi police) दिली. (Maharashtra News)

अक्षय कावलेकर आणि नामदार पठाण हे दोघेही मित्र होते. कारने दोघही आमला गावातून बसस्थानकासमोरील रस्त्याने जाण्यास निघाले. अक्षय कावलेकर हा कार चालवित होता. मात्र, भरधाव कारच्या स्टेअरिंगवरुन त्याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याकडेला खाली उतरुन समोरील झाडावर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला. तर कारमधील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्याचे लक्षात येताच आमला गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दाेघांना कारबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु दाेघांचीही मृत्यू झाला हाेता. या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट देत पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सावंगी रुग्णालयात पाठविले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT