Ahmednagar Accident News
Ahmednagar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Accident News: थरारक! मद्यधुंद टेम्पो चालकाने सासू-सूनेला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vishal Gangurde

सुशील थोरात

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना घडली. जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीसह रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलांना जोरदार जोरदार धडक दिली. काल झालेल्या या अपघातात सासू-सूनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

मद्यधुंद अवस्थेत असलेला टेम्पो चालक जामखेडकडून भरधाव वेगात नगरकडे निघाला होता. त्याचवेळी शेतातून लाकडे जमा करणाऱ्या महिला रस्त्याच्या कडेला जात होत्या. टेम्पोने नगर-जामखेड रोडवरील निंबोडी गावाजवळ आला असता, चालकाने समोरून येत असलेल्या दुचाकीसह महिलांना जोरदार धडक दिली. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही महिला सासू-सून आहेत.

वत्सला चांदणे आणि शकुंतला चांदणे असे या दोन्ही महिलांचं नाव आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात एक युवक आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या जखमींवर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून धडक देणारा चालक टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, निंबोडी गावातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टेम्पो ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत दिसल्याने नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून चालकाची सुटका करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT