accident saam tv
महाराष्ट्र

भरधाव वाळूच्या टिप्परने दुचाकी व रिक्षाला चिरडले; एक ठार

या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना - भरधाव जाणाऱ्या वाळूच्या टिप्परने दुचाकी आणि रिक्षाला चिरडल्याची घटना रात्री ११ च्या सुमारास जाफ्राबाद- टेंभुर्णी महामार्गावर घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

जाफ्राबाद शहरातील नदीपत्रातून अवैध वाळू वाहतुन करणाऱ्या भरधाव टिप्परने रणवीर ढाबा जवळ रोडने जाणाऱ्या दुचाकीला चिरडून भरधाव टिप्पर पळवत रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षात असलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला असून दुचाकीवरील दोघे व रिक्षातील तीन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी उपचारासाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन अवैध टिप्पर चालकाविरुद्ध तात्काळ कारवाई करून चालकाला अटक करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा विषयी पोलिसांना जाब विचारत पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली. या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT