Parbhani, Parbhani Accident News, Daku Pimpri Village saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: रील बनवणं बेतले जीवावर, दाेन विद्यार्थ्यांचा मृत्यू; डाकू पिंपरी गावावर शाेककळा (व्हिडिओ पाहा)

या अपघातापूर्वी विद्यार्थ्यांनी रील बनवली होती अशी माहिती समाेर आली आहे.

राजेश काटकर

Parbhani Accident News : पाथरी- सोनपेठ मार्गावर गुरुवारी झालेल्या दुचाकी आणि रिक्षा अपघातात दुचाकीवरील चार विद्यार्थी (student) गंभीर जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांपैकी दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजाराेहणासाठी पाथरी येथील कानसुरच्या चक्रधर स्वामी विद्यालयाकडे जात असताना हा भीषण अपघात (accident) झाला हाेता.

पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार स्वप्निल चव्हाण, राहुल तिथे, शंतनू सोनवणे, योगानंद घुगे हे चार विद्यार्थी डाकू पिंपरी गावाचे रहिवासी आहेत. त्यांचा काल अपघात झाला. या अपघातात विद्यार्थ्यांचा हात रस्त्यावर तुटून पडला. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई, लातूर, नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Maharashtra News)

या अपघातामधील गंभीर झालेल्या विद्यार्थींपैकी शंतनू सोनवणे, स्वप्नील चव्हाण यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हे दोन्ही विद्यार्थी (parbhani) कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयातील आहेत. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे डाकू पिंपरी गावावर शाेककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT