water drowning  saam tv
महाराष्ट्र

रिधोरा धरण परिसरात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, दोघांचा जीव वाचला, नेमकं काय घडलं?

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एक धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रिधोरा धरणाच्या घोगरा परिसरात दोन तुरुणांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पंजाब कॉलनीत राहणारा सौरभ भारस्कर (३०) आणि शिक्षक कॉलनीत राहणारा विकास नवघरे (३०) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. (Wardha latest News Update)

मिळालेल्या माहितीनुसार, रिधोरा धरण परिसरात चार मित्र फिरायला गेले होते. हे चौघेजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता एक जण बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी तिघांनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर चौघेही पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेतली. नागरिकांना दोघांना वाचविण्यात यश आले. परंतु , दोघांचा पाण्यात बुडूत दुर्देवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT