nashik saam tv
महाराष्ट्र

Nashik Accident News : नाशकात दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार, दाेन नायजेरियन युवक गंभीर जखमी

गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik Accident News : नाशिकच्या गंगापूर रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मूत्यू झाला आहे. या घटनेत दाेन नायजेरियन नागरिक (nigerian youth injured in nashik) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Maharashtra News)

या घटनेबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी दुचाकीस्वार राहुल राजगुरू हा नाशिककडून गंगापूर बारदान फाट्याकडे घराच्या दिशेने जात होता. याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव दुचाकीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार दोघे नायजेरियन दुचाकीस्वार युवक व राहुल प्रकाश राजगुरू हे रस्त्यावर कोसळले.

हा अपघात झाल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी व रस्त्याने ये-ज करणाऱ्या वाहनचालकांनी थांबून जखमींना मदत केली. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमींना रिक्षांमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी हलविले होते.

राहुल यास डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. तसेच नायजेरियन युवक अब्राहम केतार हा गंभीरपणे जखमी झाला आहे. तसेच त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक मामेर अकेच मथोठ हादेखील जखमी झाला आहे.

अब्राहमवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच राहुलच्या नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणं नंतर आज आंबेडकरी विचाराचे कार्यकर्त्यांचे निदर्शन

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT