Aurangabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं! दहावीच्या विद्यार्थीनीवर धाब्यावर नेऊन बलात्कार

औरंगाबादमध्ये एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटनांनी संताप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

Aurangabd Crime News : औरंगाबादेतील (Aurangabad) उद्योगनगरी वाळूजमध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून गेले. (Aurangabad Crime News In Marathi)

त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत घरात शिरून पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी घरात कोणीच नव्हतं.  तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT