Uddhav Thackeray-Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यात पुन्हा धक्का? काही खासदार-आमदार शिंदे गटात सामील होणार?

अनेक मोठे नेते आज शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा कृपाल तुमाणे यांनी केला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. शिवसेनेचे दोन दसरा मेळावे आज मुंबईत पार पडणार आहे. शिवसेनेचा (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट आणि शिंदे गट आज दसरा मेळाव्यानिमित्त आमने-सामने आहे. शिंदे गट दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणार असल्याचा दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे यांनी केला आहे.

आजच्या दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक मुंबईत येतील. भव्य दिव्य असा हा मेळावा असेल, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचा सोनं लुटण्यासाठी आम्ही जाणार आहोत, असं तुमाणे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

दसरा मेळावा हे शक्तीप्रदर्शन नाही. अनेक मोठे नेते आज शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा कृपाल तुमाणे यांनी केला आहे. दोन खासदार, पाच आमदार आणि अनेक मोठे नेते या मेळाव्यात शिंदे गटात प्रवेश करतील, असं तुमाणे यांनी म्हटलं आहे.

दोन पैकी एक खासदार मुंबईतील तर दुसरा खासदार मराठवाड्यातील असेल, असं तुमाणे यांनी म्हटलं आहे. मात्र ते खासदार आमदार कोण हे सांगण्यास त्यांनी नकार दिला असून सध्याकाळी मेळाव्यात ते स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे दसरा मेळाव्यानिमित्त आमने-सामने आलेल्या शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना कोणता धक्का मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. आहे. दोन्ही दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून दादरमधील शिवाजी पार्क आणि बीकेसी येथील दोन्ही मैदानं सज्ज झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dowry System : लग्नात हुंडा घेणारे नामर्द; प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं परखड मत

Rainfall Alert : सतर्क राहा! पुढचे ७ दिवस धो-धो कोसळणार, IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

SCROLL FOR NEXT