Uddhav Thackeray, Eknath Shinde, Maharashtra Politics, saam tv
महाराष्ट्र

Shivsena : गद्दार आमदार, खासदारांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंची माेठी खेळी; माताेश्रीतून हालचाली

आज माताेश्रीत हाेणार प्रवेश

राजेश काटकर

हिंगोली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या सेनेशी (shiv sena) बेईमानी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात दाखल झालेल्या आमदार संतोष बांगर व खासदार हेमंत पाटील यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात मोठी खेळी खेळली आहे. काँग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक (election) लढविलेले अजित मगर यांना आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.

याबाबतची अधिकृत माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिली. या दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गटातील उमेदवारांविरोधात तगडं आव्हान राहील असं शिवसेना नेत्यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. संतोष टारफे तसेच वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविलेले अजित मगर या दाेघांचा जनतेत दांडगा संपर्क आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी मातोश्रीवरुन हालचाली झाल्या. हे दोन्ही नेते आज शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT