IND vs PAK Asia Cup 2022: हिटर हार्दिक! अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकून टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय

IND vs PAK Asia Cup 2022 Live Score: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होत आहे.
IND vs PAK Asia Cup 2022 Live Score
IND vs PAK Asia Cup 2022 Live ScoreSaam TV

हिटर हार्दिक! अखेरच्या ओव्हरमध्ये सिक्स ठोकून टीम इंडियाचा पाकिस्तानवर विजय

10 षटक समाप्त

टीम इंडियाचा अर्धा डाव पूर्ण झाला आहे. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या तीन विकेट 62 धावा आहे. रवींद्र जडेजा 8 तर सूर्यकुमार यादव 2 धावांवर खेळत आहे.

टीम इंडियाला तिसरा झटका, रोहितनंतर कोहली झेलबाद

टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मा झेलबाद

टीम इंडियाला मोठा झटका कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. रोहितला मोहम्मद नवाजने इफ्तिखार अहमदच्या हाती झेलबाद केले. रोहितने 12 धावांची खेळी केली. आता रवींद्र जडेजा क्रीझवर आला आहे.

भारताचा स्कोअर - 10/1

टीम इंडियाची धावसंख्या दोन षटकांनंतर एका विकेटसह 10 आहे. विराट कोहली 8 तर रोहित शर्मा 1 धावेवर खेळत आहे. पाकिस्तानकडून शाहनवाज दहानीने दुसरे षटक टाकले ज्यामध्ये 7 धावा आल्या.

पहिल्याच चेंडूवर राहुल बाद, कोहली थोडक्यात बचावला

पाकिस्तानचे भारतापुढे १४८ धावांचे आव्हान

भुवनेश्वर कुमारची जोरदार कामगिरी; पाकिस्तानला नववा झटका

पाकिस्तानचा स्कोअर-111/5

16 षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 111 धावा आहे. आसिफ अली 9 आणि शादाब खान 5 धावा करत खेळत आहे. चहलने चार षटकात 32 धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.

हार्दिकने आणखी एक विकेट घेतली

हार्दिक पांड्याने तिसरी विकेट घेतली. यावेळी हार्दिकने खुशदिल शाहला रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद केले. खुशदिल शाहला केवळ दोन धावा करता आल्या. पाकिस्तानची धावसंख्या 14.3 षटकात 5 विकेट गमावत 98 धावा आहे. शादाब खान आणि आसिफ अली क्रीजवर आहेत.

पाकिस्तानला तिसरा झटका

हार्दिक पांड्याने पाकिस्तानला तिसरा धक्का दिला आहे. हार्दिकने इफ्तिखार अहमदला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी झेलबाद केले. इफ्तिखार अहमदने 22 चेंडूत 28 धावा केल्या. 12.1 षटकांनंतर धावसंख्या - 87/3. खुशदिल शाह फलंदाजीला आला आहे.

आठ षटके पूर्ण झाली

चहलने आपल्या पहिल्या षटकात आठ धावा दिल्या, त्यामुळे 8 षटके पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या आता दोन बाद 59 अशी आहे. इफ्तिखार अहमद 13 आणि रिझवान 24 धावांवर खेळत आहे.

पाकिस्तानला दुसरा झटका, बाबरनंतर फखरही बाद

पाकिस्तानला दुसरा धक्का. फखर जमान पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. झमान (10 धावा) आवेश खानने त्याची विकेट घेतली. सहा षटके संपल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या 2 बाद 43 अशी आहे. फखर जमान 20 आणि इफ्तिखार अहमद 1 वर खेळत आहेत.

तीन षटकांची समाप्ती

तीन षटकं संपल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेट १९ धावा आहेत. रिझवान ३ आणि फखर जमान ४ धावांवर आहे.

पाकिस्तानला पहिला झटका, बाबर आझम आउट

पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार बाबर आझम पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

पाकिस्तान - 14/0

अर्शदीप सिंगने भारतासाठी दुसरे षटक टाकले, ज्यामध्ये एकूण 4 धावा आल्या. दोन षटके संपल्यानंतर पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद 14 धावा आहे. बाबर आझम 10 आणि मोहम्मद रिझवान 2 धावा करत खेळत आहे.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

भारत रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह

भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध पाकिस्तान, आज होणार महामुकाबला...

आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना खेळवला जाणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com