Amravati Shocking Saam tv
महाराष्ट्र

Amravati Shocking : अमरावतीत पहाटे दोन मुलींची अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू; कुटुंबावर शोककळा

Vishal Gangurde

अमर घटारे, साम टीव्ही प्रतिनिधी

अमरावती : अमरावतीच्या विरुळ रोघेमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील विरुळ रोघे येथे अचानक दोन मुलींची प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेने विरुळ गावात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे.

अमरावती येथील विरुळ रोघे येथे शुक्रवारी पहाटे काही लहान मुलांची अचानक प्रकृती खालावली. या लहान मुलांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या मुलांपैकी दोन मुलींचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेने विरुळ रोघे गावात शोककळा पसरली आहे. नंदिनी साव आणि चैताली साव अशी मृतक मुलींचे नाव आहे. या दोन मुलींना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या गावातील दोन लहान मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक लहान मुलगा आणि एक मुलगी असे दोघांवर धामणगाव रेल्वे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर गावात आरोग्य विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. या पथकाकडून शाळा, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची तपासणी सुरु केली आहे. त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने देखील घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावात पाणी पुरवठा होणाऱ्या पाईप लाईन नाल्यातून गेली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन करतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गडचिरोलीत २८ जणांना विषबाधा

गडचिरोलीत बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची घटना घडली . गडचिरोलीतील रोपीनगट्टा या गावातील ही घटना आहे. विषबाधा झालेल्या लोकांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जेवणानंतर अनेकांना उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीने दुसरी पंगत थांबवण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT