Ambarnath  Saam TV
महाराष्ट्र

Ambarnath News: खड्ड्यात पडून दोन लहानग्यांचा बुडून मृत्यू, ठेकेदारावर कारवाईची नागरिकांची मागणी

अंबरनाथच्या नेवाळी परिसरात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खड्डा खोदला होता.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

अंबरनाथच्या नेवाळी परिसरात जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पाणी देखील साचलं होतं. मात्र खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपायोजना किंवा बॅरिकेडिंग केलेली नव्हती. याच परिसरात राहणारी दोन मुले येथे खेळत असतान खड्ड्यात पडले आणि त्यात त्यांचा बुडून दुर्दैव मृत्यू झाला. (Latest News)

सुरज राजभर (वय ८ वर्षे) आणि सनी यादव (वय ६ वर्षे) अशी दोन मृत मुलांची नावे आहेत. यानंतर हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र स्थानिकांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Spilt : ममता बॅनर्जींचे २० खासदार 'नॉट रीचेबल'; भाजप मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, महाराष्ट्रासारखा पक्ष फुटणार?

Empty Stomach Fruits: रिकाम्या पोटी ही फळं चुकूनही खाऊ नयेत

Hair Care: केसगळती, कोंडा आणि ड्रेयनेसला म्हणा बाय-बाय! फक्त या सवयींनी मिळतील हेल्दी केस

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Silver Price Today: सोन्यानंतर चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT