Breaking - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट ट्विटर कडून लॉक Saam Tv
महाराष्ट्र

सत्तेच्या दबावाला बळी पडून Twitter ने भूमिका ठरवू नये - थोरात

ट्विटर Twitter हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेले समाज माध्यम असून सत्तेच्या दबावास बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नयेत असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ट्विटर Twitter हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेले समाज माध्यम असून सत्तेच्या दबावास बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नयेत असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ट्विटरच्या कारवाईचा निषेध करत, लोकशाहीच्या हितास्तव आवाज उठवत राहू, लढत राहू आणि संघर्ष करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे देखील पहा -

ट्विटरच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत थोरात म्हणाले की, ट्विटर @TwitterIndia ने माझे ट्विटर हॅण्डल लॉक केले. त्याचे कारण काय तर राहुल गांधीजी यांना समर्थन करणारे ट्विट मी केले म्हणून! मुळात राहुल गांधी हे लढवय्ये नेते असून ते निडरपणे सामान्य जनतेसोबत उभे राहतात व त्यांचा आवाज बनतात.

राहुलजी यांचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ट्विटर हे एक समाजमाध्यम असून, आपण आपली मते तिथे मांडू शकतो. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि आम्ही काँग्रेसजन ट्विटरच्या माध्यमातून जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतो.

ट्विटरने काही दिवसांपूर्वी अटी व नियमांचे उल्लंघन झाल्याच्या कारणावरून राहुल गांधी यांचे अकाऊंट लॉक केले आणि आज काँग्रेस पक्षाच्या अधिकृत @INCIndia, @INCMaharashtra या हॅण्डलसह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची हॅण्डल लॉक केली. आम्ही देशविघातक, धार्मिक द्वेष वाढविणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारी मते मांडली नसून एका पिडीत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हा काय गुन्हा आहे का? असा उद्विग्न सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT