Sangli news Saam Tv
महाराष्ट्र

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Sangli news : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली बाजार समितीत हळदीच्या सौद्यांना विक्रमी प्रतिसाद मिळाला. उच्च प्रतीच्या हळदीला १७,८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तर सर्वसाधारण हळदीला १०,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

Alisha Khedekar

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला १७ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. दहा हजार रुपये हा कमीत कमी दर मिळाला आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणली होती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ पार पडला.ज्यामध्ये उच्च प्रतीच्या हळदीला १७ हजार ८०० रुपये इतका उच्चांक दर मिळाला आहे.तर सर्वसाधारण हळदीला कमीत कमी १० हजार रुपये इतका दर मिळाला आहे.

गुळाचे सौदे देखील पार पडले. गुळाला चार हजार ते साडेचार हजार रुपये इतका दर मिळाला आहे. यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन पाहता हळदीला चांगले दर मिळतील,असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT