Tur Dal Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Tur Dal Price Hike: स्वयंपाक घरातील बजेट आता कोलमडणार आहे. कारण तुरडाळीच्या दरामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Rohini Gudaghe

स्वयंपाक घरातील बजेट आता कोलमडणार आहे. कारण तुरडाळीच्या दरामध्ये (Tur Dal Price) १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत बाजारात डाळींची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तुरडाळीची किंमत वाढली आहे. आता तूरडाळ १०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे.

तुरडाळ प्रामुख्याने विदर्भातील अकोला, यवतमाळ, मराठवाडा आणि लातूरमधून येत असते. यावर्षी डाळींच्या उत्पादनात सरासरी ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही वाढत्या मागणीमुळे तुरडाळीच्या (Tur Dal) दरात देखील वाढ झाली आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये डाळीची आवक घटलेली आहे.

अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाल्याचं व्यापारी सांगत आहे. येत्या महिन्यात डाळींची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली (Tur Dal Price Hike) आहे. परंतु डाळीचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. वाढत्या किमतीचा परिणाम तुर डाळ खरेदीवर झाला आहे. बाजारात डाळींची खरेदी कमी झालीय, तर व्यापारीदेखील कमी डाळ खरेदी करत असल्याची माहिती मिळत आहे.

तुरीच्या डाळीची किंमत मालाच्या गुणवत्तेनुसार साधारण ७० ते १४० रुपये प्रति किलो असते. परंतु, एपीएमसी बाजारात तूरडाळीची किंमत आता दीडशे रुपयांच्या पुढे गेली आहे. २६ एप्रिल रोजी (Tur Dal Rate) एपीएमसीच्या बाजारात तुरीडाळीचे दर ११० ते १७० रुपये किलो होते. हरभरा डाळीची किंमत ६८ ते ८५ रुपये प्रति किलो आहे. मसूर डाळ ७१ ते ११५ रुपये प्रति किलोने विकली जातेय. मूग डाळीची किंमत देखील ९९ ते १४० रुपये किलो झाली आहे. उडीद डाळीचा दर ८३ ते ११५ रुपये प्रति किलो आहे. चवळी ८० ते १३५ रुपये प्रति किलोने विकली जातेय.

मुंबईत मागील वर्षांपर्यंत १५ टन तूरडाळ येत होती. परंतु दरवाढीमुळे ही आवक कमी झालीय. आवक आता तीन टनांवर आली आहे. परंतु मुंबईकरांची डाळीची मागणी पाच टनांपेक्षा जास्त (Tur Dal Rate Update) आहे. दर जास्त असल्यामुळे किरकोळ व्यापारी कमी प्रमाणात डाळ खरेदी करत आहेत, अशी माहिती एपीएमसी मार्कटमधील घाऊक किराणा व्यापारी अमरिश बरोत यांनी दिली आहे.

भारतीय व्यापारी महासंघ महाराष्ट्राचे सचिव शंकर ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने लहान व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि सुपर मार्केटचे साखळी दुकानदार यांना १५ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा घोषित करण्यास सांगितलं आहे. केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालक, मिल मालक यांना तूरडाळीचा साठा घोषित करण्याची सूचना दिल्या आहेत. विक्रेत्यांना लवकरच साठामर्यादा लागू होण्याची शक्यता अखिल भारतीय व्यापारी महासंघाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT