Vitthal Rukmini Pandharpur, Pandharpur Maghi Yatra, Tulshi archan pooja saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: गुढी पाडव्यापासून विठ्ठल मंदिरात तुळशी अर्चन पूजा; जाणून घ्या देणगी मूल्य

Tulshi Archan Puja: याबाबतची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

भारत नागणे

Pandharpur News : विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या गुढीपाडव्याच्या (gudi padwa 2023) मुहूर्तावर विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाची तुळशी पूजा (vitthal tulshi pooja) करता येणार आहे. त्याबाबतचा निर्णय नुकताच मंदिर समितीने (shri vitthal rukmini mandir) घेतला आहे.

भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नित्यपुजा, पाद्यपुजा व चंदनउटी पुजा करण्यात येतात. या पुजांना मिळणारा प्रतिसाद पाहता तसेच भाविकांच्या मागणीनुसार तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. (Maharashtra News)

ही पुजा यात्रा, सण, उत्सव इत्यादी दिवस वगळून इतर दिवशी दैनंदिन सकाळी महानैवेद्यापुर्वी, दुपारी पोषाखापूर्वी व सायंकाळी धुपारतीपूर्वी या वेळेत प्रत्येकी दहा प्रमाणे एकूण 30 पुजा उपलब्ध होणार आहेत.

त्यामध्ये एका पुजेसाठी जास्तीत जास्त 5 भाविकांना प्रवेश दिला जाणार असून प्रतिपुजेसाठी दाेन हजार शंभर रुपये इतकी देणगी मुल्य राहणार आहे. भाविकांनी‌ तुळशी पूजेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By: Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Pune : पुण्यातील कृषी महाविद्यलयातील डॉ. महानंद माने यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT