tuljapur , tuljabhavani mandir, tuljabhavani temple saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani : तुळजाभवानीस अर्पण केलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासली जाणार, 28 लाखाचे कैरेट मीटर दाखल

मागील चौदा वर्षात ८१ किलो पैकी ३३ किलो सोने अशुद्ध असल्‍याचे आढळून आले हाेते.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljabhavani devi) मंदिरात आता भाविकांनी (devotees) दान केलेल्या दागिन्यांची शुद्धता तात्काळ समजणार आहे. या दागिन्यांची शुद्धता तपासणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे तब्बल २८ लाख रुपये किंमतीचे कॅरेट मीटर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून (tuljabhavani mandir sansthan) खरेदी करण्यात आले आहे. (Maharashtra News)

तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani mandir) दर्शनासाठी देशभरातुन भाविक येत असतात. भाविकांची देवीवर अपार श्रद्धा आहे. त्यातूनच भाविक देवीस (Gold) सोने चांदीचे दागिने अर्पण करतात. या अर्पण केलेल्‍या दागिन्‍यांमध्‍ये मागील चौदा वर्षात ८१ किलो पैकी ३३ किलो सोने अशुद्ध असल्‍याचे आढळून आले.

यंदा नवरात्राेत्सव काळात तसेच अन्य सणादिवशी देवीला भाविकांनी सोन्या चांदिसह अनेक मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. आता भाविकांनी दान केलेल्या दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी तब्बल २८ लाख रुपये किंमतीचे कॅरेट मीटर मंदिर संस्थानने खरेदी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे आता दागिन्यांची शुद्धता तात्काळ समजणार असल्याने याच्या नोंदी ठेवणे देखील मंदिर संस्थानला सोप्पं होणार आहे अशी माहिती सोमनाथ माळी (व्यवस्थापक, तुळजाभवानी मंदिर संस्थान) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT