FDA  Saam tv
महाराष्ट्र

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

fda action : अन्न व औषध प्रशासानाचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर आहे. त्यांच्या विभागाने प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका दिलाय .

Saam Tv

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्री विरोधात मोठी कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने केली धडक कारवाई

दोन दिवसांच्या कारवाईत 32 आरोपी अटक

संजय गडदे, साम टीव्ही

राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 30 मे आणि 31 मे 2026 या दोन दिवसांत राज्यभरात 40 ठिकाणी कारवाई केली. या कारवाईदरम्यान 32 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 26 आस्थापना सील करून 12 लाख 16 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि नियमबाह्य साठा विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.

राज्यात सर्वाधिक कारवाई कोकण विभागात करण्यात आली. येथे 16 आस्थापनांवर छापे टाकून 16 जणांना अटक करण्यात आली. याशिवाय 14 आस्थापना सील करण्यात आल्या. या विभागातून 3 लाख 1 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे विभागात 3 ठिकाणी कारवाई करण्यात आलीये. तर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 2 वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नाशिक विभागात 2 ठिकाणी छापे टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली. 3 लाख 58 हजार 981 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 1 वाहन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 1 लाख 50 हजार रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 11 ठिकाणी कारवाई करण्यात आली. 7 आरोपींना अटक करण्यात आली. विभागाने 5 आस्थापना सील करण्यात आल्या. या कारवाईत 2 लाख 27 हजार 739 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

अमरावती विभागात 3 कारवाया करून 3 आरोपींना अटक करण्यात आली. 24 हजार 702 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई विभागात 1 कारवाई करण्यात आली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली.

कायद्यानुसार गुन्हे दाखल

या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 204 आणि 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 च्या कलम 26, 27, 30(2)(3) आणि 59 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 24 एफआयआर दाखल करण्यात आल्या असून 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

SCROLL FOR NEXT