खामगावजवळ मुंबई नागपूर महामार्गावर ट्रक कारची समोरासमोर धडक
महामार्गावरील भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू
अपघातग्रस्त कारमध्ये २७ किलो गांजा आढळल्याने खळबळ
संजय जाधव, साम प्रतिनिधी
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वर खामगावनजीक आज सकाळी ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल २७ किलो गांजा आढळून आल्याने या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे.
सतीश सखाराम जाधव (रा. परभणी) आणि सय्यद फिरोज सय्यद मेहमूद अशी मृतांची नावे आहेत. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता पोलिसांना कारमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे १४ लाख रुपये किमतीचा २७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
यासोबतच अपघातग्रस्त कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी दोन्ही मृतकांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताच्या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असतानाच, कारमध्ये गांजा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अपघाताचे नेमके कारण आणि गांजाच्या वाहतुकीमागील पार्श्वभूमीचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.