Maharashtra Government Big Decision Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Government: मोठी बातमी! आदिवसी विद्यार्थ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

Fadnavis Government Takes Major Decision: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची आणखी एक मागणी मान्य केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

Priya More
  • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

  • आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर समिती गठीत

  • सेंट्रल किचनच्या गुणवत्तेसाठी सरकारकडून समिती गठीत केली जाणार

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सरकारने उचलली मोठी पावले

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सुविधांच्या मागणीसाठी मुंबई आदिवसी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यानच फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. फडणवीस सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांची आणखी एक मागणी मान्य केली. आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसोबत चर्चेसाठी समिती गठीत केली जाणार आहे. ठाण्याचे अपर आयुक्त गोपीचंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यीय समिती गठीत करण्यात येणार आहे.

फडणवीस सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत ९ सदस्यांची समिती गठीत करण्याचे आदेश दिले. सदर समिती सेंट्रल किचन बाबत उपाययोजना सुचविणार आहे. राज्यातील सर्व सेंट्रल किचनला समितीचे सदस्य भेट देणार आहेत. गुणवत्ता सुधारण्यासाठी समिती सेंट्रल किचन चालकांसोबत चर्चा करणार आहे. शालेय व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी प्रतिनिधींसोबत ही चर्चा करतील. ३० ऑक्टोबरपर्यंत समिती प्राथमिक अहवाल आदिवासी विकास आयुक्तांकडे देणार आहे. तर आदिवासी विकास आयुक्त ६ नोव्हेंबरपर्यंत शासनाला अंतिम अहवाल देणार आहे.

आदिवासी मुलांचे आणि मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २७ जून रोजी बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृहाबाबत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मध्यवर्ती स्वयंपाकगृहामधून शाळेत विद्यार्थ्यांना अन्न पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या प्रणालीतील गुण दोष आणि त्यावर करता येणारी उपाययोजना याचा अभ्यास करण्यात यावा. मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आणि अन्य सुधारणांबाबत शालेय व्यवस्थापन समिती तसेच शालेय विद्यार्थी प्रतिनिधींसोबत विचार विनिमय करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या या मागणीनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्यातील काही शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत भोजन पुरवठा करण्यात येतो. मध्यवर्ती स्वयंपाकगृहामधून शाळेत विद्यार्थ्यांना अन्न पोहोचविण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या दृष्टीने तसेच या प्रणालीतील गुण दोष आणि त्यावर करता येणारी उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे. तसेच मध्यवर्ती स्वयंपाकगृहाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आणि अन्य सुधारणांबाबत शालेय व्यवस्थापन समिती तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींसोबत विचार विनिमय करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cerebral Palsy in Children: मुलाच्या हालचालींमध्ये वारंवार अडचण येतेय? सेरेब्रल पाल्सीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Maharashtra News Live Update: निवडणूक आयुक्त आम्हाला का भेटत नाहीत? राहुल गांधींचा सवाल

Ethanol blended petrol: इथेनॉलमुळे गाडीचा कोणता पार्ट सर्वात पहिला खराब होतो?

Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

पूर्णेकरहत्येनंतर ठाण्यात आणखी एका शिवसेनेच्या दिवंगत नगरसेवकाच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकी

SCROLL FOR NEXT